पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजनमंत्री घेणार दि. 3 फेब्रुवारीला आढावा
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज
जिल्हा नियोजन समितीची सभा
नियोजनमंत्री घेणार दि. 3 फेब्रुवारीला आढावा
अकोला, दि. २८ : राज्याचे कामगार मंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक
नियोजनभवनात उद्या शुक्रवार, दि. ३१ जानेवारी रोजी दु. १ वाजता होणार आहे.
गत जुलैमध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, अनुपालन, जिल्हा वार्षिक
योजना २०२५-२६ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजनेत दि. २३
जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा, सन २०२४-२५ मध्ये पुनर्विनियोजनास मान्यता
देणे व त्याअनुषंगाने वेळेवर येणा-या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील
सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख आदी बैठकीला उपस्थित राहतील.
नियोजनमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यस्तरीय बैठका
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या
अध्यक्षतेत सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दु. २ वा. राज्यस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे
होणार आहे. त्यावेळी अकोला जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ आराखड्याबाबत
नियोजन होणार आहे. सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी नियोजनभवन येथे उपस्थित राहतील.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा