विद्यार्थ्यांना मिळाले हवामानशास्त्राचे धडे हवामान विभागाचा वर्धापनदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा







 विद्यार्थ्यांना मिळाले हवामानशास्त्राचे धडे

हवामान विभागाचा वर्धापनदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

अकोला, दि. 15 : भारतीय उपखंडातील मान्सूनचे महत्व, पर्जन्यमान कसे मोजले जाते, हवामानाचे अंदाज कसे वर्तवले जातात याचे धडे आज विद्यार्थ्यांना मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील हवामानशास्त्र कार्यालयातर्फे विभागाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

हवामानशास्त्र विभागाच्या कार्यक्रमात प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व व्याख्याने झाली. जिल्हा हवामानशास्त्र अधिकारी राजेंद्र कौशल, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, नायब तहसीलदार गणेश वाकुडकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, प्रा. सुधीर कोहचाडे, गुरूनानक विद्यालयाच्या प्राचार्य मीरा आहुजा, संतोष पंजवाणी, चेतना नागवाणी आदी उपस्थित होते.

श्री. कौशल यांनी विभागाचा इतिहास, नवे तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. श्री. पवार, श्री. साबळे, श्री. कोहचाडे, श्रीमती आहुजा यांचीही भाषणे झाली.  त्यानंतर श्री. कौशल आणि वैज्ञानिक सहायक कार्तिक वणवे यांनी विद्यार्थ्यांना पाऊस मोजण्याचे यंत्र- साधारण वर्षामापी, अद्ययावत वर्षामापी, दिशादर्शक यंत्र, हवामान अनुमानदर्शक यंत्रणा आदी सर्व यंत्रणेची प्रात्यक्षिकासह इत्थंभूत माहिती दिली. नवी दिल्ली येथील कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्याख्यानाचे प्रक्षेपणही यावेळी करण्यात आले.


यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील गुणवंतांना पारितोषिक वितरण करण्यात आले. हवामान कार्यालयाचे वैज्ञानिक सहायक शुभम धुळेकर, माजी भूकंपशास्त्र सहायक मधुकर जवंजाळ, सहायक शुभम राठोड, श्याम अलकरी यांच्यासह गुरूनानक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :