तब्बल आठ वर्षांनी मिळाली वेतन व उपदानाची रक्कम विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नांना यश
तब्बल आठ वर्षांनी मिळाली वेतन व उपदानाची रक्कम
विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नांना यश
अकोला, दि. 15 : दिवंगत कर्मचा-याचे आठ वर्षांपासून प्रलंबित वेतन व
उपदानाची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे
मिळू शकली.
जि. प. येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकारी
यांचे अकस्मात निधन झाले होते. त्यांच्या उपदानाची सुमारे सात लाख रू. ची रक्कम प्रलंबित
होती. त्यासाठी त्यांचे पती व कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी कार्यालय, जि. प. कडे पाठपुरावा
केला. अर्जदाराचे प्रकरण वरिष्ठ लेखाधिकारी कार्यालय येथे प्रलंबित होते. आपली हक्काची
रक्कम मिळावी म्हणून अर्जदाराने विधी सेवा प्राधिकरणाकडेही अर्ज केला.
विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर उच्च न्यायालयातील विधी सेवा उपसमितीकडे
विनंती करण्यात आली. त्यानुसार पाठपुरावा होऊन उपदानाची मूळ रक्कम अर्जदाराला मिळाली.
अर्जदाराने समाधान व्यक्त केले. आपसातील वाद मध्यस्थी केंद्रात मिटविण्यासाठी, तसेच
शासन स्तरावर काही वैध समस्या, अडचणी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाचे
सचिव योगेश पैठणकर यांनी केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या मार्गदर्शनात
जिल्हा प्राधिकरण कार्यरत असून, कार्यालयीन संपर्क क्रमांक 8591903930 आणि (0724)
2410145 असा आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा