रेल्वेच्या कामासाठी अकोला- मंगरूळपीर वाहतुकीत बदल
रेल्वेच्या कामासाठी अकोला-
मंगरूळपीर वाहतुकीत बदल
अकोला, दि. 2 : दक्षिण मध्य रेल्वेच्या
ट्रॅक व रस्त्याच्या कामासाठी अकोला ते मंगरूळपीर रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात
आला आहे.
या मार्गावरील रेल्वे फाटक क्र.
87 जवळ ट्रॅक व रस्ता तयार करण्यासाठी अकोला ते मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक दि. 3
जानेवारी ते दि. 5 जानेवारी या कालावधीत रात्री 10 वा. पासून ते सकाळी 5 वा. पर्यंत
पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. पर्यायी मार्ग बार्शिटाकळी- कापशी ते अकोला किंवा
बार्शीटाकळी- पिंपळखुटा- विझोरा- कान्हेरी असे आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा