‘एमपीएससी’ची २२ उपकेंद्रांवर रविवारी पूर्वपरीक्षा

 

‘एमपीएससी’ची २२ उपकेंद्रांवर रविवारी पूर्वपरीक्षा

अकोला, दि. ३० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्ह्यातील २२ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी ११ वा. ते दु. १२ वा. होणार आहे.

या सर्व उपकेंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते सायं. ८ वा. दरम्यान परीक्षा उपकेंद्रांच्या आतील संपूर्ण व बाहेरील १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स (कौलखेड), शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा, जागृती विद्यालय, प्रभात किडस् स्कूल (वाशिम रस्ता), श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, एलआरटी वाणिज्य महाविद्यालय (भाग एक व दोन अशी दोन उपकेंद्रे), सीताबाई कला महाविद्यालय, भारत विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय (देशमुखपेठ), डवले कनिष्ठ महाविद्यालय (मोठी उमरी), दि नोएल इंग्रजी विद्यालय (कौलखेड रस्ता), उस्मान आझाद उर्दू विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, ज्युबिली इंग्रजी विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, आर. एल. टी. विज्ञान महाविद्यालय, स्व. ज्योती जानोळकर विद्यालय (कपिलवस्तूनगर), श्रीमती मेहरबानो विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले जि. प. माध्यमिक कन्या शाळा आदी उपकेंद्रांवर परीक्षा होईल.

परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेशास मज्जाव, तसेच झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर सुरू ठेवण्यास व ध्वनीक्षेपक, इंटरनेट, मोबाईल, अनधिकृत व्यक्ती, वाहने यांना मनाई करण्यात आली आहे.

०००   

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा