बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य बालगृहाची पाहणी करणार
बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य बालगृहाची पाहणी करणार
अकोला, दि. 15 : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर हे दि.17 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर, बालगृहाची पाहणी करतील.
समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने ते जिल्हाधीकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याशीही चर्चा करणार आहेत. बालगृह, सखी वन स्टॉप सेंटर येथे भेट, तसेच बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, बालकांच्या क्षेत्रातील संस्था, रेल्वे पोलीस, आरोग्य विभाग, कामगार विभाग, पोलीस विभाग, समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण विभाग, बालगृह व शिशुगृहे आदींचा आढावा घेतला जाणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा