छोट्या उद्योगांच्या निर्यातवाढीच्या दिशेने सकारात्मक
पाऊल
अकोला डाकघर निर्यात केंद्रातून अमेरिकेला पहिले पार्सल रवाना
अकोला, दि. 14 : छोट्या उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू परदेशात
निर्यात करण्यासाठी अकोला येथे डाकघर निर्यात केंद्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
येथील एका व्यावसायिकाला ई-व्यापार संकेतस्थळावर मिळालेल्या ऑर्डरनुसार या केंद्रातून
भांड्यांचे पहिले पार्सल अमेरिकेला रवाना करण्यात आले. छोट्या व किरकोळ व्यावसायिक-उद्योजकांसाठी
हे केंद्र निर्यातीसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे.
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकांसाठी निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा
जुन्या सुती बाजारातील पंचशील इमारतीत झाली. त्यावेळी टपाल कार्यालयाचे विपणन अधिकारी
गजानन राऊत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, परदेशी व्यापार व निर्यातीसाठी मुंबई
येथे जाऊन एजंट नेमण्याची गरज नाही. छोट्या व किरकोळ व्यावसायिकांना मिळालेल्या ऑनलाईन
ऑर्डरनुसार आपल्या वस्तू जगातील अनेक देशात पाठवता येणार आहे. वस्तू त्या त्या देशातील
ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत मागोवा घेतला जातो व ट्रॅकिंगचे अपडेटस् निर्यातदाराला
मिळत राहतात.
निर्यातीला प्रोत्साहन देणे व रोजगारनिर्मितीचे लक्ष्य साध्य करणे हा
कार्यशाळेचा हेतू असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी
सांगितले. या कार्यशाळेत उद्योग विभागाचे साकेत पांडे, सनदी लेखापाल नविन कृपलानी,
सल्लागार अंकित गुप्ता, आकाश शहा, लघुउद्योग सल्लागार प्रीतम लोणकर, वस्तू व सेवा कर
विभागाचे प्रवीण भोपळे यांनी मार्गदर्शन केले.
उद्योग निरीक्षक अंकिता पाचंगे यांनी सूत्रसंचालन केले. अधिक्षक भगवंत
अनवणे यांनी आभार मानले. कार्यशाळेला उद्योजक, नवउद्योजक, अधिकारी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा