भारतीय हवामान विभागाच्या सेवेला 150 वर्ष पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी कार्यक्रम

 

 

भारतीय हवामान विभागाच्या सेवेला 150 वर्ष पूर्ण

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी कार्यक्रम

अकोला, दि. 13 : भारतीय हवामान विभागाच्या सेवेला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरातील हवामान कार्यालयात दि. 15 जानेवारी रोजी स. 11 वा. व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय हवामान विभागात देशात आजघडीला चार हजारांहून अधिक वैज्ञानिक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जगातील एक अत्याधुनिक हवामान संस्था म्हणून भारतीय हवामान विभागाची (आयएमडी) ओळख आहे. हवामानाविषयी अचूक अंदाज व धोके, पुर्वानुमान आदी माहिती प्रसारित करून लोकजीवन सुरळीत ठेवण्यासाठी हवामान विभाग कार्य करतो.

यानिमित्त नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित दि. 14 जानेवारी रोजी कार्यक्रम होईल. त्याचे थेट प्रसारणही हवामान केंद्रातर्फे येथे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, दि. 15 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवर, तसेच विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित राहतील. हवामान केंद्रातर्फे स्थापित उपकरणांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाईल. हवामान अंदाजाबाबत अचूकतेवर भर देण्यात येत असून, विभागाकडून अद्ययावत तंत्रज्ञान व प्रणाली आत्मसात करण्यात आल्या आहेत, असे हवामान अधिकारी

राजेंद्र कौशल यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :