जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान

 




 

जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी  

जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान

अकोला, दि. 15 : रेशीम उद्योग हा कृषीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून रेशीम जनजागृती रथ जिल्ह्यात मार्गस्थ करण्यात आला.

जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक संजय हरसुले, वरिष्ठ क्षेत्र सहायक अनिल सुळकर,क्षेत्र सहायक सुनिल मानकर, ललित येवले, पीटीओ संदीप आगे आदी उपस्थित होते,

 

 

 

 

महारेशीम अभियान 9 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. रेशीम रथ ठिकठिकाणी पोहोचून अभियान कालावधीत तुती लागवड करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी 682 मनुष्य दिवस मजुरी,  तर रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम करिता 213 दिवसाची मजुरी असे एकूण 815 दिवसांची मजुरी  297 रूपये दराने  2 लक्ष 65 हजार 815 कामाच्या प्रगतीनुसार अदा करण्यात येते. तसेच साहित्य खरेदीसाठी 1 लक्ष 53 हजार रू. खरेदीनंतर देण्यात येतात. तीन वर्षात एकूण 4 लक्ष 18 हजार 815 रू. दिले जातात.

निकष

योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी अल्प भूधारक असावा, त्यांच्याकडे जॉब कार्ड असावे, स्वतः च्या नावे जमीन 7/12, 8 अ असावा. सिंचनाची सोय असावी, स्वतः मजूर म्हणून काम करावे. आधार, बँक पासबुक छायाप्रतीसह अर्ज करावा. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम विभागाशी संपर्क साधावा. आपले सरकार पोर्टलवरसुद्धा तुती लागवडीबाबत नोंदणी करता येते. योजनेच्या पात्रतेनुसार शेतकऱ्यांनी या अभियानकाळात नोंदणी करावी, असे आवाहन श्री. फडके यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :