पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक

 गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक   -प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे  परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम) माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी      अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे  कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला  350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक...

‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन

  ‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन अकोला, दि.   २६ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या “ ई-भूमिती प्रकल्प ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्डच्या अंतिम नामांकन यादीसाठी निवड झाली आहे. ही   जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून आता या यशाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आपल्या प्रत्येक मताची गरज आहे. त्यामुळे संबंधित लिंकवर जाऊन मताची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   हा प्रकल्प नागरिकांना भूमी संदर्भातील सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आला आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेने अकोला जिल्ह्याने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपले एक मत अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देऊ शकते. त्यामुळे 🔗 https://exhibition.skoch.in/beacon-of-hope/collector-officer-akola/ या लिंकवर “ e-Bhoomiti Project – Collector Office Akola ” ला आपले अमूल्य मत द्यावे. अकोला जिल्ह्याचा डिजिटल प्रगतीचा ध्वज उंचावणार आहे. मत देताना दिनांक २५ फेब्रुवारी ...

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इमेज
  शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू   बुलडाणा, दि. २५ : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या'ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही  होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा उपक्रम न  राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले. केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा,  अ. भा. आयुर्वेद ...

जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षा मीना   अकोला, दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट असून, ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन- जलजीवन मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. मिशनमधील उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक योजनेचा सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.     यावेळी कार्यकारी अभियंता श्री. राठोड म्हणाले, योजनेत अकोला तालुक्यातील ८९, अकोटमधील १४५, तेल्हारा तालुक्यातील ९६, बाळापूर तालुक्यातील ६५, पातूर तालुक्यातील २८, मूर्तिजापूर तालुक्यातील ७१, ...

टीएमएस 2.0 : जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी अद्ययावत प्रणाली

इमेज
  टीएमएस 2.0 : जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी अद्ययावत प्रणाली कार्यान्वयनानंतर पहिल्या तासातच जिल्ह्यातून रूग्णांची नोंद प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचा-यांचे प्रयत्न     अकोला ,   दि. २४ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद ,   पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी राज्यात    टीएमएस 2.0 (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर कार्यप्रणाली सुरू होताच पहिल्या तासात जिल्ह्यातून ६ रूग्णांनी नोंद केली.   या प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक ,   जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार आहे.   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4 हजार 537 रुग्णालयांमध्ये 2 हजार 399 मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ सोमवारी करण्यात आला आहे.   योजनेत अकोला जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्रांस...

जीडीसी अँड ए. व सी.एच.एम.परिक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज 10 मार्चपर्यंत करता येईल

  जीडीसी अँड ए. व सी.एच.एम.परिक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज 10 मार्चपर्यंत करता येईल अकोला दि. 23 - सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (जीडीसी अॅन्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षा मे- २०२६' बाबत अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. परीक्षेतून उत्तीर्णांना नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, कृषि उत्पन बाजार समिती अशा सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये पदभरतीसाठी प्राधान्य देण्यात येते. तसेच सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सेवानियमातील तरतुदीनुसार सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वेतनवाढ देण्यात येते. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणाकरिता शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या लेखापरीक्षकांचे नामतालिकेवर लेखापरीक्षकांचे नाव समाविष्ट करण्यासाठी सदर परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सदर परीक्षा दि. २६, २७ व २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. जी. डी. सी. अँण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षा, २०२६ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १० मार्...

निश्चित वेळापत्रकाने रोजगार मेळाव्यांना वाढता प्रतिसाद प्रफुल्ल शेळके यांची माहिती

इमेज
  निश्चित वेळापत्रकाने रोजगार मेळाव्यांना वाढता प्रतिसाद प्रफुल्ल शेळके यांची माहिती अकोला, दि. 23 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्लेसमेंट ड्राईव्हचे निश्चित वेळापत्रक, त्याची व्यापक प्रसिद्धी व विविध उद्योगांशी सतत संपर्क, सुटसुटीत प्रक्रिया केल्याने जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांना प्रतिसाद वाढत आहे. अकोला येथील केंद्रातर्फे दर महिन्याच्या तिस-या बुधवारी रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित दिवसाची कल्पना मिळाल्याने त्यांच्याकडून जागांबाबत चौकशी केली जाते, तसेच मेळाव्यात सहभागासाठी आवश्यक तयारी केली जाते. दिवस निश्चित असल्याने हमखास प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे, वेळापत्रकामुळे सातत्यही राखले जाते. उमेदवार व नियोक्ता दोहोंनाही या उपक्रमाचा लाभ होत आहे, असे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले. पोर्टलवरील नोंदणीबाबतही सुटसुटीत माहिती उपलब्ध करून दिली जाते. केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह- पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा झाला. त्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. या मेळ...

'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ

इमेज
    'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ अकोल्यात साकारणार बचत गटांसाठी ‘उमेद’ मॉल उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणणे आवश्यक – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर   अकोला, दि. २० : बचत गटांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणून अधिक ग्राहकाभिमुख होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे केले.   ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद– राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे 'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, जिल्ह्यात 20 कोटी रू. निधीतून उमेद म...

शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे भव्य पदयात्रा

    शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे भव्य पदयात्रा अकोला, दि. 18 :   जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या दि. 19 फेबुवारीला स. 7. 30 वा. पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. ही पदयात्रा अकोला बसस्थानक चौक, अशोक वाटिका चौक मार्गे येऊन नियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी व खेळाडू यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   ०००

शेतकरी खातेदारांना कर्जासाठी केवायसी करणे आवश्यक

  शेतकरी खातेदारांना कर्जासाठी केवायसी करणे आवश्यक अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत व दि. अकोला - वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जांबाबत शेतकऱ्यांनी केवायसी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी मयत झाले असतील त्यांच्या वारसांनी विविध सेवा सहकारी संस्था व दि. अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेत वारसांची नावे देऊन सर्वांनी त्यांचे आधार कार्ड संबंधीत गटसचिव व बँकेचे शाखाधिकारी यांचेकडे जमा करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण एच लोखंडे यांनी केले आहे. अकोला तालुक्यातील 256, अकोटमधील 78, बार्शिटाकळीतील 320, बाळापूरमधील 81, पातुरमधील 133, तेल्हारामधील 253, मुर्तिजापूरमधील 437 असे एकूण 1 हजार 558 खातेदारांचे आधार कार्ड प्रत सोसायट्यांकडे उपलब्ध नाहीत.   राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत, कर्जाच्या विळख्यातुन सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालिन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शेती कर्जाची माहिती पोर्टलवर भरण्याबाबत शासनाचे युध्द पातळीवर कामकाज सुरु...

अनुसूचित जातीतील युवकांना विनामूल्य डीटीपी प्रशिक्षण

  अनुसूचित जातीतील युवकांना विनामूल्य डीटीपी प्रशिक्षण अकोला, दि. 18 : जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जातीतील युवकांसाठी एक महिना कालावधीचे विनामूल्य डीटीपी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण दि.२८ फेब्रुवारी ते ०४ एप्रिलदरम्यान विवेकानंद संगणक केंद्र, वानखडे नगर, अकोला येथे होईल. अनुसूचित जातीतील युवक- युवती, नवउद्योजकांना उद्योजकता विकास संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय - स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. या अनिवासी स्वरुपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना     डी.टी.पी. चे परिपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण देऊन यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना-सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकांचे अनुभव कथन उद्योगांना प्रत्यक्ष भेटी इ. विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. पात्रता कमीत...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी

    जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी अकोला, दि. 18 : पुढील महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाहीदिन दि. 2 मार्च रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.     दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.   सामान्य नागरिकांनी तसेच दिव्यांग नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज (तालुका लोकशाही दिनानंतर) विहीत नमुन्यात लोकशाहीदिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तक्रार विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. ०००

सत्तरीपुढील रूग्णांसाठी ‘वय वंदना कार्ड’ जिल्ह्यात गावोगाव मोहिम राबविणार

      सत्तरीपुढील व्यक्तींना उपचारांसाठी ‘वय वंदना कार्ड’ जिल्ह्यात गावोगाव मोहिम राबविणार अकोला, दि. 18 : एकत्रित आयुष्मान भारत योजना- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत 70 वर्षांपुढील व्यक्तींसाठी ‘वय वंदना कार्ड’ मोहिम जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी जिल्ह्यात सेतू केंद्रे किंवा आपल्या गावातील आशासेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   वयाची 70 वर्ष पूर्ण झालेल्या किंवा त्यावरील वयाच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वय वंदना कार्डधारकांना अंगीकृत रूग्णालयात 5 लाख रू. चे वार्षिक विमा कवच दिले जाणार आहे. आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रू. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष विनामूल्य उपचार मिळतो. तथापि, गंभीर आजारांच्या ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी उपचारांची गरज भासू शकते. अशा 70 वर्षांवरील रूग्णांना वय वंदना कार्डद्वारे अतिरिक्त उपचार घेता येतात.     ०००

पीयुसी सेवेसाठी आधारप्रमाणित मोबाईल क्रमांक आवश्यक

    पीयुसी सेवेसाठी आधारप्रमाणित मोबाईल क्रमांक आवश्यक अकोला, दि. 18 : पीयुसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहन मालकांचे अद्ययावत संपर्क तपशील वाहन प्रणालीत उपलब्ध नसल्याने पीयुसी, विमा, दंड, कर (ई-चलान) आदी वाहनासंबंधी सूचना वाहनधारकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीयुसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसेल तर पीयुसी सेवा देण्यात येणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे. ०००

जिल्ह्यात 7 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

  जिल्ह्यात 7 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील 7 गावांत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी नवीन दर्जेदार प्रशिक्षण संस्थांची निवड प्रक्रिया सुरू आहे.     हातगाव (मुर्तिजापूर), आलेगाव (पातूर) चोहट्टा, मुंडगाव, (अकोट), हिवरखेड, मालेगाव (तेल्हारा) व वाडेगाव (बाळापूर) या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र" ही योजना राबवली जाते. पात्र व इच्छूक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्तावाचा विहित नमुना, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे   उपलब्ध आहे. ०००

जिल्ह्यात 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

    जिल्ह्यात 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे.     अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, म्हैसांग, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादूरा, सागद, नागद, मांजरी येथील 8 वाळूघाटांच्या ई-लिलावाला अकरावी मुदतवाढ देण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कोळसरा-1, खापरवाडा-2 (खैरी), लोणसणा, बपोरी, पिंगळा दापुरा, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2, हिंगणा शिकारी, मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव आदी 10 वाळूघाटांना नववी मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाळूघाटांच्या ऑनलाईन ई-निविदा दि. 24 फेब्रुवारीला दु. 12 वा. पर्यंत स्वीकारण्यात येतील. तांत्रिक लिफाफा व त्यानंतर आर्थिक लिफाफा दि. 25 फेब्रुवारीला उघडण्यात येईल. ई-लिलाव प्रक्रिया दि. 27 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दु. 1 वा. दरम्यान होईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे यांनी दिली. ०००

जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींतील 139 जागांसाठी पोटनिवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

    जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींतील 139 जागांसाठी पोटनिवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध अकोला, दि. 18 :   जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतीतील 126 ग्रा. पं. सदस्य पदे व 13 थेट सरपंच पदे अशा एकूण 139 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ग्रा. पं. स्तरावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी दिली. तेल्हारा तालुक्यातील हिंगणी खु. (प्रवर्ग-ना. मा. प्र. स्त्री), अकोट तालुक्यातील धारगड (अ. ज.), वडाळी सटवाई (अ. ज. स्त्री), धामणगाव (अ. ज.), बांबर्डा (अ. ज.), मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव (ना. मा. प्र. स्त्री), अकोला तालुक्यातील भौरद (अ. ज. स्त्री), सांगवी मोहाडी (स. सा.), बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा (अ. ज. स्त्री), जनुना (स. सा. स्त्री), उजळेश्वर (स. सा.), पातूर तालुक्यातील गोंधळवाडी (ना. मा. प्र. स्त्री), तुलंगा खु. (स. सा.) अशा 13 थेट सरपंच पदांचा पोटनिवडणूकीत स...

एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती

  एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती अकोला, दि. 18 :   एस. टी. महामंडळाच्या एक वर्ष मुदतीसाठी शिकाऊ उमेदवार पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीत यांत्रिक (मोटारगाडी), शीट मेटल (एमव्हीबीबी), डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर, रेफ्रिजेशन व एअर कंडिशन, पेंटर आदी 83 पदे समाविष्ट आहेत.   त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ‘ॲप्रेंटिसशीप इंडिया’ (https: apprenticeshipindia.org) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्यात एमएसआरटीसी अकोला ही आस्थापना निवडावी. ऑनलाईन अर्ज केल्यावर विहीत नमुन्यातील अर्ज दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत विभागीय कार्यालय, मंगरूळपीर रोड, अकोला येथे स्वीकारले जातील.   ०००

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

  पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन अकोला, दि. १७ : नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह” अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये चार नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ८३ पदांची भरती केली जाणार असून दहावी, बारावी, आयटीआय व पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी  https://rojgar.mahaswayam.gov. in/#/home/index  या वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ऑनलाईन सहभाग नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे : 1.  www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळाला भेट द्या. 2. एम्प्लॉयमेंट टॅबवर क्लिक करा. 3. जॉब सिकर पर्याय निवडून सेवायोजन नोंदणी क्रमांक/आधार क्रमांक व पासवर्ड वापरून स...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार –2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार –2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई / अकोला दि. 17 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहिर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने   dgipr.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 00000