मतदान जनजागृतीसाठी शुक्रवारी दिव्यांग मतदार रॅली

 

मतदान जनजागृतीसाठी शुक्रवारी दिव्यांग मतदार रॅली

अकोला, दि. 11 :  लोकसभा  सार्वत्रिक  निवडणूकीच्या अनुषंगाने ‘स्वीप’अंतर्गत दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदान जनजागृती रॅली उद्या  शुक्रवार, दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी 8 वाजता रॅलीचा शुभारंभ होईल. तेथून अशोक वाटिका ते पंचायत समिती कार्यालय व पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय  असा रॅलीचा मार्ग असेल. दिव्यांग मतदारांचे  मतदान  100 टक्के होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा रॅलीचा उद्देश आहे. दिव्यांग कर्मचारी संघटना, दिव्यांग मतदार, दिव्यांग शाळा यांनी रॅलीमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ