उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अकोला, दि. 22 :लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. मतदारांनी उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

हे करा

डोक्याला रूमाल, टोपी, छत्री वापरा. पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबूपाणी, नारळ पाणी, ओआरएस आदी द्रवपदार्थ घ्यावेत. पातळ, सच्छिद्र, सुती कपडे वापरावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे.   प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रूमाल, दुपट्टा वापरावा.   अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी लक्षणे व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

हे करू नका

चप्पल न घालता, अनवाणी उन्हात चालू नये.  लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडी बंद करू नये. मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेले किंवा कार्बोनेटेड द्रवाचे सेवन टाळावे. गडद, घट्ट व जाड कापड घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे व स्वयंपाकघराची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ