मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

 

मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

अकोला, दि. 5 : घराच्या परिसरातील नवमतदार, दिव्यांग, महिला, 85 वर्षावरील मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे व मतदानाविषयी जनजागृतीच्या कार्यात सहभागी होणार असल्याची शपथ  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतली.

महाविद्यालयीन नवमतदारांमार्फत मतदारांमध्ये जागृती व्हावी यासाठी ‘स्वीप’अंतर्गत कार्यक्रम झाला. कुटुंबातील व शेजारील मतदारांना मतदानाकरीता प्रवृत्त करण्याबाबत ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात रॅली

‘स्वीप’अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात रॅली काढण्यात आली. तेथेही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीची शपथ घेतली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शरद ज्ञानेश्वर जावळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन झाले. स्वीप नोडल अधिकारी मनोज बोपटे, विस्तार अधिकारी कृषी पं.स. आनंद डिक्कर यांनी परिश्रम घेतले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विवेक घोंगडे, राम पुंडकर, श्री. वाघमारे व श्री. धुरतकर यांनी परिश्रम घेतले.

  

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ