लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान; पथके केंद्रांवर रवाना

मा.भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्‍या संदर्भिय प्रेस नोट व्‍दारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला असून त्‍याअंतर्गत 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता मतदान दिनांक 26/04/2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीतसंपन्‍न होणार आहे. त्‍याअनुषंगाने आज दिनांक 25/04/2024 रोजी 06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत सर्व 6 विधानसभा मतदार संघामधील मतदान पथके रवाना झाली आहेत.

            निवडणूक नियमानुसार दिनांक 24/04/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता निवडणूकीचा जाहीर प्रचार थांबला आहे.

v  मतदान केंद्रे व मतदान पथकेः

06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व), 32-मुर्तीजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार विभागातील एकूण 2056 मतदान केंद्रांकरीता नियुक्‍त मतदान पथके व वाहनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

मतदान केंद्रांची संख्‍या

नियुक्‍त मतदान पथके (राखीव सह)

कर्मचारी संख्‍या

1

28-अकोट

336

374

1870

2

29-बाळापुर

340

378

1890

3

30-अकोला (पश्चिम)

307

342

1824

4

31-अकोला (पुर्व)

351

390

1950

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

385

428

2140

अकोला जिल्‍हा

1719

1912

9674

6

33-रिसोड

337

374

1870

एकूण….

2056

2286

11544

 

                वरीलप्रमाणे नियुक्‍त मतदान अधिकारी/कर्मचा-यांपैकी टपाली मतदानाव्‍दारे तसेच Election Duty Certificate व्‍दारे करण्‍यात येणा-या मतदानाची माहिती खालीलप्रमाणे आहे

 

अधिकारी/कर्मचारी संख्‍या

वितरीत करण्‍यात आलेले EDC

टपाली मतपत्रिकेची  मागणी (इतर मतदार संघामध्‍ये कार्यरत असलेले)

अकोला जिल्‍हा

9674

7419

1307

33-रिसोड

1870

47

1439

एकूण

11544

7466

2746

 

v  पोलीस बंदोबस्‍ताबाबत :

06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व), 32-मुर्तीजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार विभागनिहाय एकूण 6,101 पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या असून त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ. क्र.

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

मतदान केंद्रांची संख्‍या

महसूल झोन

DySP

PI

PSI/ API

पो.कर्म.

RCP

होमगार्ड

CAPF

SAP / SRPF

1

28-अकोट

336

24

1

4

21

489

22

269

5

6

2

29-बाळापुर

340

28

1

3

24

483

22

280

1

6

3

30-अकोला (पश्चिम)

307

28

1

7

24

487

30

268

4

6

4

31-अकोला (पुर्व)

351

33

1

4

25

496

16

311

4

3

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

385

40

1

4

28

574

26

331

0

5

एकूण ..

1719

153

6

26

152

3045

151

1777

14

26

6

33-रिसोड

337

30

1

4

30

516

35

318

0

0

मतदार संघ एकूण

2056

1833

7

30

182

3561

186

2095

14

26

 

 

v  वाहतूक आराखडा :

06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व), 32-मुर्तीजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार विभागातील वापरण्‍यात येत असलेल्‍या वाहनांची प्रकार निहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

बसेस

मिनी बस

झोनल अधिकारी

भरारी पथक / इतर पथक

इतर आवश्‍यक जीप

ट्रक/ आयशर/ कंटेनर

एकूण

235

32

93

59

171

3

593

 

 

 

 

 

 

v  विशेष मतदान केंद्रेः

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार 06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत महिला, दिव्‍यांग व युवा महिला अधिकारी/कर्मचारी यांचेव्‍दारा संचालीत मतदान केंद्रे खालीलप्रमाणे आहेत-

 

महिला अधिकारी / कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रेः

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग

मतदान केंद्राचे नाव

1

28-अकोट वि.स.म.सं.

187-123-जि.प.माध्‍यमिक शाळा , इमारत मध्‍य भाग, अकोट खोली क्र..1

2

29-बाळापूर वि.स.म.सं.

114-जिल्‍हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, विद्युत नगर, क्र.2, पारस ता.बाळापुर

3

30-अकोला पश्चिम वि.स.म.सं.

81-मनपा उर्दु शाळा क्र.8, खोली क्र.4, अकोला पश्चिम

4

30-अकोला  पश्चिम वि.स.म.सं

91-जि.प.प्राथ.शाळा क्र.1, टिळक रोड, खोली क्र.1 अकोला पश्चिम

5

31-अकोला पुर्व वि.स.म.सं.

195-श्रीमती एल.आर.टी.कॉलेज, अकोला खोली क्र.3

6

31-अकोला पुर्व वि.स.म.सं.

113-जे.बी.एन.पी. हिंदी विद्यालय, मुर्तिजापुर ,खोली क्र.2

7

33-रिसोड वि.स.म.स.

295-भारत प्राथ.शाळा रिसोड खोली क्र.3 पुर्व बाजू

 

युवा अधिकारी/कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रेः

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग

मतदान केंद्राचे नाव

1

28-अकोट वि.स.म.सं.

187-श्री.नरसिंग कला व वाणिज्‍य महाविदयालय अकोट खोली क्र.2

2

29-बाळापूर वि.स.म.सं.

153-जि.प.बांधकाम विभाग इमारत, पं.स.बाळापूर

3

30-अकोला  पश्चिम वि.स.म.सं.

47-शिवाजी कॉलेज नरनाळा इमारत खोली क्र 2

4

30-अकोला  पश्चिम वि.स.म.सं.

135-भिकमचंद खंडेलवाल शाळा खोली क्र 1 पुर्व कडील इमारत

5

31-अकोला पुर्व वि.स.म.सं.

163-भारत विदयालय तापडीया नगर खाली क्र.1

6

32-मुर्तिजापूर वि.स.म.सं.

107-गाडगे महाराज विदयालय मुर्तिजापूर खोली क्र.1

7

33-रिसोड वि.स.म.स.

295-भारत माध्‍यमिक शाळा रिसोड खोली क्र.1

 

दिव्‍यांग अधिकारी/कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रेः

.क्र.

विधानसभा मतदार विभाग

मतदान केंद्राचे नाव

1

28-अकोट वि.स.म.सं.

147-श्री.शिवाजी माध्‍यमीक शाळा,अंजनगाव रोड अकोट खोली क्र.3

2

29-बाळापूर वि.स.म.सं.

131-जि.प.माध्‍यमिक शाळा खामगाव नाका, बाळापूर

3

30-अकोला  पश्चिम वि.स.म.

233-गुरुनानक विदयालय, अकोला खोली क्र.6

5

32-मुर्तिजापूर वि.स.म.स.

108-गाडगे महाराज विदयालय मुर्तिजापूर खोली क्र. 2

6

33-रिसोड वि.स.म.स.

273-उत्‍तमचंद  बागडीया कॉलेज रिसोड खोली क्र.3

 

            तसेच 30-अकोला (पुर्व) विधानसभा मतदार विभागातील मतदान केंद्र क्रमांक           184-दादासाहेब दिवेकर प्राथमीक शाळा अकोला खोली क्र 3, अकोला हे तृतीयपंथी मतदारांकरीता विशेष मतदान केंद्र म्‍हणून निश्चित करण्‍यात आले आहे.

 

 

अन्‍य कार्यालयांच्‍या सहकार्याने तयार करण्‍यात येणारी आदर्श मतदान केंद्रे

 

अ.क्र.

मतदार विभाग क्रमांक व नांव

मतदान केंद्र क्रमांक व नांव

1

28-अकोट

154-नगर परिषद  मराठी शाळा, क्र.1 पुर्व भाग अकोट खोली क्र. 1

2

28-अकोट

179-श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट खोली क्र. 4

3

28-अकोट

188-श्री शिवाजी महाविद्यालय, दर्यापूर रोड अकोट खोली क्र. 3

4

29-बाळापूर

153-जि.प.बांधकाम विभाग, खोली क्र.1, बाळापूर

5

29-बाळापूर

146-न.प.प्राथ.उर्दु शाळा क्र.7, कासारखेड, बाळापूर

6

29-बाळापूर

277-मौलाना अबुल कलाम आझाद हॉल, पातूर

7

29-बाळापूर

262-न.प.मराठी मुलांची शाळा क्र.1, खोली क्र.1, दक्षिण भाग पातूर

8

29-बाळापूर

262-न.प.मराठी मुलांची शाळा क्र.1, खोली क्र.2, दक्षिण भाग पातूर

9

30-अकोला (पश्चिम)

28-मनपा प्राथमिक मराठी मुलांची शाळा नं 12 खो. नं. 4

10

30-अकोला (पश्चिम)

83-मनपा उर्दु मुलांची शाळा नं. 8 खो. नं. 1

11

30-अकोला (पश्चिम)

128-मनपा पश्चिम झोन ऑफिस खोली क्रमांक 1

12

30-अकोला (पश्चिम)

240-मनपा नरुमल केवलराम संताणी सिंदी हिंदी शाळा नं. 1 खोली क्र. 1

13

31-अकोला (पुर्व)

168-महानगर पालिका कमलाबाई चांदुरकर के एम एम शाळा क्र 7 खोली क्र 3 जुनी ईमारत

14

31-अकोला (पुर्व)

184-दादासाहेब दिवेकर प्राथमीक शाळा अकोला खोली क्र 3

15

31-अकोला (पुर्व)

221-पोतदार इंटरनॅशनल इंग्‍लीश स्‍कूल, अकोला गोकुळ कॉलनी अकोला खोली क्र 1

16

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

95-स्‍व.रामदास भैय्या दुबे प्राथ्‍ शाळा, मुर्तिजापूर

17

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

114-वसंतराव नाईक, न.प. प्राथ.शाळा, खोली क्र.1 मुर्तीजापूर

18

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

115-वसंतराव नाईक, न.प. प्राथ.शाळा, खोली क्र.2 मुर्तीजापूर

19

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

248-पंचायत समिती कार्यालय, बार्शिटाकळी खोली क्रमांक 3

 

 

 

 

 

 

 

v  मतदार यादीतील मतदारांचा तपशिलः

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत     दिनांक 04/04/2024 या नामनिर्देशन पत्र दाखल करावयाच्‍या अंतीम दिनांकापर्यंत प्राप्‍त अर्जांच्‍या अनुषंगाने प्रत्‍यक्ष मतदानाकरीता निश्चित करण्‍यात आलेल्‍या मतदार विभाग निहाय अंतीम मतदार यादीतील मतदारांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे –

 

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

मतदार संख्‍या

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

1

28-अकोट

157388

142973

1

300362

2

29-बाळापुर

155863

144798

1

300662

3

30-अकोला (पश्चिम)

167936

164805

22

332763

4

31-अकोला (पुर्व)

175134

165652

16

340802

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

155407

144884

5

300296

6

33-रिसोड

165772

150157

0

315929

एकूण….

977500

913269

45

1890814

 

            वरीलप्रमाणे एकूण 1890814 मतदार उद्या दिनांक 26/04/2024 रोजी आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

            ज्‍या मतदान केंद्रांवर 75% पेक्षा अधिक मतदान होईल त्‍या मतदान केंद्रांकरीता नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) तसेच मतदानाकरीता विशेष प्रयत्‍न करणा-या अंगणवाडी सेवीका यांना जिल्‍हा स्‍तरावर विशेष कार्यक्रमा आयोजित करुन “Champion of Democracy” या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार सर्व मतदारांना मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत प्रत्‍यक्ष घरोघरी भेटी देऊन मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्‍यात आले आहे.

            महानगरपालीका, नगर परिषद, ग्रामपंचायत स्‍तरावर दवंडी, घंटागाडी तसेच अन्‍य माध्‍यमांव्‍दारे मतदानाचे दिवशी सर्व मतदारांना मतदान करण्‍याबाबत आवाहन करण्‍यात येणार आहे.

 

v  सेवा दलातील मतदारः

            06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत विधानसभा मतदार विभाग निहाय सेवा दलातील मतदारांची माहिती खालीलप्रमाणे आहे –

 

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

सेवा मतदार संख्‍या

आतापर्यंत प्राप्‍त संख्‍या

1

28-अकोट

797

449

2

29-बाळापुर

962

3

30-अकोला (पश्चिम)

296

4

31-अकोला (पुर्व)

608

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

650

6

33-रिसोड

530

एकूण….

3843

            वरीलप्रमाणे सेवा मतदारांना त्‍यांचा मतदानाचा हक्‍क बजावण्‍याकरीता मा.भारत निवडणूक आयोगाकडून ETPBS (Electronically Transmitted Postal Ballot System) व्‍दारे सुवीधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.

 

v  दिव्‍यांग व 85+ मतदारांचा तपशीलः

मा.भारत निवडणूक आयोगाकडून दिव्‍यांग तसेच 85 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्‍या मतदारांना त्‍यांनी सादर केलेल्‍या विकल्‍पानुसार Home Voting ची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती. त्‍याकरीता निश्चित करण्‍यात आलेले मतदार तसेच त्‍यांचेव्‍दारे करण्‍यात आलेल्‍या मतदानाची मतदार विभागनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र.

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

दिव्‍यांग मतदार संख्‍या

85+ मतदार संख्‍या

एकूण

झालेले मतदान

1

28-अकोट

182

220

402

2197

2

29-बाळापुर

143

363

506

3

30-अकोला (पश्चिम)

100

178

278

4

31-अकोला (पुर्व)

130

338

468

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

66

187

253

6

33-रिसोड

105

346

451

एकूण….

726

1632

2358

 

            वरीलप्रमाणे Home Voting करीता निश्चित करण्‍यात आलेल्‍या मतदारांपैकी 93.17% इतक्‍या मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला आहे.

v  मतदार ओळख चिठ्ठी वाटपः

            वर नमुद केल्‍यानुसार 06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत येत असलेल्‍या एकूण 1890814 मतदारांपैकी 1852997 एवढ्या मतदारांना (98%) मतदानाचे अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत दिनांक 21/04/2024 रोजीपर्यंत मतदार चिठ्ठीचे वाटप करण्‍यात आले आहे.

            त्‍याचप्रमाणे मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार अंध मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता यावा, त्‍यांना त्‍यांचा मतदार यादीतील तपशील समजावा याकरीता त्‍यांना Braile लिपी मधील मतदार चिठ्या संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत वितरीत करण्‍यात आल्‍या आहेत.


 

 

 

v  मतदान यंत्रेः 

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 06-अकोला लोकसभा मतदार संघा अंतर्गत मतदार विभाग निहाय वितरीत करण्‍यात आलेल्‍या मतदान यंत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे-

विधानसभा मतदार विभाग क्रमांक व नांव

एकूण मतदान केंद्रांची संख्‍या

उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असलेल्‍या मतदान यंत्रांची टक्‍केवारी

BU-136%

CU-136%

VVPAT-145%

28-अकोट

336

456

456

487

29-बाळापूर

340

462

462

493

30-अकोला (पश्चिम)

307

417

417

445

31-अकोला (पुर्व)

351

477

477

508

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

385

523

523

558

एकूण

1719

2335

2335

2491

 

v  Web Casting बाबतः 

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांपैकी 50% मतदान केंद्रांवर web casting करावयाची आहे. त्‍याअनुषंगाने 06-अकोला लोकसभा मतदार संघांतील एकूण 2056 मतदान केंद्रांपैकी एकूण 1038 मतदान केंद्रांवर web casting करण्‍याचे निश्चित करण्‍यात आलेले आहे.

            सदर निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मतदानाचे दिवशी web casting करण्‍यात येणा-या मतदान केंद्रांची मतदार संघनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र.

मतदार संघ  क्रमांक व नांव

मतदान केंद्र संख्‍या

Web Casting करण्‍यात येणा-या मतदान केंद्रांची संख्‍या

1

28-अकोट

336

168

2

29-बाळापुर

340

170

3

30-अकोला (पश्चिम)

307

160

4

31-अकोला (पुर्व)

351

177

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

385

193

अकोला जिल्‍हा एकूण

1719

868

6

33-रिसोड

337

170

06-अकोला लोकसभा मतदार संघ एकूण

2056

1038

 

 

 

v  मतदान केंद्रांवरील सुविधाः

प्रत्‍येक मतदान केंद्रांवर पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करण्‍यात आली आहे. मतदारांना रांगांमध्‍ये उभे राहावे लागू नये याकरीता कुपन पध्‍दती वापरण्‍यात येणार असून समोरील 4-5 मतदारांनंतर रांगेतील इतर मतदारांना टोकन देऊन त्‍यांचेकरीता सावलीची तसेच बसण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

प्रत्‍येक मतदान केंद्रावर मेडीकल किट उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली असून संभाव्‍य त्रासाचे अनुषंगाने जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचे सूचनेनूसार त्‍यामध्‍ये औषधी पुरविण्‍यात आलेल्‍या आहेत. कुठल्‍या त्रासाकरीता कोणती औषधी याबाबतची जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक अकोला यांचेकडून पुरविण्‍यात आलेली यादी देखील मेडीकल किट सोबत देण्‍यात आली आहे.

आरोग्‍य विभागाकडून प्रत्‍येक मतदान केंद्रावर paramedical staff नियुक्‍त करण्‍यात आला असून मतदान पथक अथवा तेथील मतदारांना काही त्रास उद्भवल्‍यास वैद्यकीय पथकास त्‍वरीत त्‍या ठिकाणी पोहोचून औषधोपचार करता येईल.

      प्रत्‍येक झोनल अधिकारी यांचेसोबत एका वैद्यकीय अधिकारी यांचीनियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

 

v  सुरक्षा कक्षः

06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता दिनांक 26/04/2024 रोजी घेण्‍यात येणा-या मतदानानंतर मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्‍याकरीता सुरक्षा कक्ष म्‍हणून महाराष्‍ट्र वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी, फेज-4, शिवणी अकोला हे ठिकाण निश्चित करण्‍यात आले आहे.

उद्या दिनांक 26/04/2024 रोजी मतदान प्रक्रिया संपल्‍यानंतर मतदान यंत्रे ही त्‍या-त्‍या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्‍यालयी जमा होणार आहेत. त्‍यानंतर सर्व मतदान यंत्रे सीलबंद कंटेनर मधून आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍तामध्‍ये वरीलप्रमाणे सुरक्षा कक्ष येथे पोहोचणार आहेत.

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार आवश्‍यक त्‍या सर्व बाबींची पुर्तता करण्‍यात येऊन अद्यावत असे सुरक्षा कक्ष तयार करण्‍यात आलेले आहे. त्‍याकरीता आवश्‍यक तो पोलीस बंदोबस्‍त नियुक्‍त करण्‍यात आलेला आहे.

v  सार्वजनिक सुट्टी जाहीरः

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदानाचे दिवशी मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता यावा याकरीता लोकसभा मतदार संघामध्‍ये पराक्राम्‍य संलेख अधिनियम,1881(1881) चा 26 च्‍या कलम 25 खाली सामान्‍य प्रशासन विभागाकडील राजपत्र, असाधारण भाग एक-मध्‍य उप-विभाग अधिसूचना दिनांक 3 एप्रिल 2024 अन्‍वये मतदानाचे दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्‍यात आली आहे.

तसेच महाराष्‍ट्र शासन, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांकःलोसानि-2024/प्र.क्र.26/उद्यांग-6 दिनांक 22 मार्च 2024 अन्‍वये कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्‍याबाबत सूचना निर्गमीत करण्‍यात आलेल्‍या आहेत.

 

 

v  उष्‍माघातापासून बचावः 

मा.भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 26/04/2024 रोजी मतदान घेण्‍यात येणार आहे. एप्रिल महिन्‍यामध्‍ये प्रचंड उन असल्‍यामुळे उष्‍माघाताचा धोका संभवतो. त्‍याअनुषंगाने ज्‍या मतदान केंद्रांवर मतदान केंद्राच्‍या बाहेर शेड नाहीत त्‍याठिकाणी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात शेड उभारण्‍यात आली आहेत.

त्‍याचप्रमाणे सर्व मतदारांनी उष्‍माघातापासून बचावाचे अनुषंगाने जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक अकोला यांनी निर्गमीत/प्रसिध्‍द केलेल्‍या सूचनांचे पालन करुन आपला मतदानाचा हक्‍क बजावावा व स्‍वतःची काळजी घ्‍यावी.

 

v  निवडणूकीची तयारीः 

            06-अकोला लोकसभा मतदार संघाअंतर्गत स्‍थापन करण्‍यात आलेली विविध पथके, विविध यंत्रणा, विविध समित्‍या, मतदान पथके तसेच संपुर्ण यंत्रणा निवडणूकीकरीता सज्‍ज झाली आहेत.

 

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 06-अकोला लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्‍यामध्‍ये आपले अमूल्‍य योगदान द्यावे व मतदान अवश्‍य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

 

************

 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ