मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के वाटप करा - निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश



मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के वाटप करा

-        निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

अकोला, दि. 22 : मतदार चिठ्ठ्यांचे (वोटर इन्फर्मेशन स्लीप) घरोघर वाटप करण्यात येत आहे. त्यातून कुणीही मतदार सुटता कामा नये, याची मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कुंभार यांनी आज मतदान केंद्रांची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश दिले.  

श्री. कुंभार यांनी मतदार चिठ्ठी वाटपाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला, तसेच कमलानगर येथील आनंद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मतदार चिठ्ठ्यांचे वाटप प्रत्येक घरी पोहोचून काटेकोरपणे करावे. हे शंभर टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातून एकही घर सुटता कामा नये, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिले. मतदारसंघात मतदार चिट्ठीवाटपाच्या कामाला वेग देण्यात आला असून, या चिठ्ठीमुळे मतदाराला मतदान केंद्राचा तपशील व इतर माहिती मिळणार आहे

निवडणूक कालावधीत उष्मा लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मतदान केंद्रावर पंखा, पिण्याचे पाणी, मेडिकल कीट आदी आवश्यक साधने, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सहाय्य, पेयजल, आरो्ग्य पथक आदी सुविधांबाबत खातरजमा करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ