महाराष्ट्रदिनानिमित्त शास्त्री क्रीडांगणावर मुख्य सोहळा

 महाराष्ट्रदिनानिमित्त शास्त्री क्रीडांगणावर मुख्य सोहळा 

अकोला, दि. २९ :  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ   दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे होईल. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण सकाळी ७.३०  वाजता होईल.  मुख्य ध्वजारोहण सोहळा राज्यभर एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार असल्याने सकाळी ७.१५ ते ९ वा. दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कुठलाही शासकीय समारंभ किंवा अर्धशासकीय सोहळा घेण्यात येऊ नये, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केली आहे.       
००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम