दिव्यांग विद्यालय येथे रॅलीद्वारे मतदानाबाबत जनजागृती

दिव्यांग विद्यालय येथे रॅलीद्वारे मतदानाबाबत जनजागृती

अकोला, दि.  4 :  ‘स्वीप’अंतर्गत शहरातील मलकापूर येथे स्व. कनुबाई वोरा अंध विद्यालय येथे रॅलीद्वारे आज दिव्यांग मतदार जनजागृती करण्यात आली.

दिव्यांग शाळा व शाळेतील विशेष शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा या उपक्रमात सहभाग होता. ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. दिव्यांग मतदार, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांना मतदान करण्याविषयी आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, सहाय्यक आयुक्त तथा दिव्यांग कक्षाच्या नोडल अधिकारी मंगला मून, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रदीप सुसतकर, मुकबधिर मुलीची शाळेचे अधिक्षिका सी. सुषमा मसने व सी. अलका मोडक, अधिक्षिका. शासकीय मुकबधिर विद्यालय, मुख्याध्यापक ज्ञानबा केंद्रे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

०००




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ