कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी सहायक कामगार आयुक्तांचे आदेश

 

कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी

सहायक कामगार आयुक्तांचे आदेश

 

      अकोला, दि. 19  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे यादिवशी  सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश सहायक कामगार आयुक्तांनी जारी केले आहेत.

ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.  

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापनाधारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

00000

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ