मतदार जागृतीसाठी मानवी साखळी; अकोलेकरांना सहभागाचे जिल्हाधिका-यांचे आवाहन जिल्ह्यात 10 हजार विद्यार्थी घेणार एकाचवेळी शपथ

 

मतदार जागृतीसाठी मानवी साखळी; अकोलेकरांना सहभागाचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

जिल्ह्यात 10 हजार विद्यार्थी घेणार एकाचवेळी शपथ

अकोला, दि. 17 : मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी 10 हजार विद्यार्थी एकाचवेळी प्रतिज्ञा घेणार असून, ‘स्वीप’अंतर्गत या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे. यावेळी भव्य मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. मुख्य कार्यक्रमात 2 हजार विद्यार्थी सहभागी होणार असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यक्रम याचवेळी होणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक विद्यार्थी एकाचवेळी शपथ घेणार आहेत.  मानवी साखळीबरोबरच ‘मैं भारत हूँ’ या गीताचे प्रसारणही यावेळी होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.  या उपक्रमासाठी विविध शाळा, महाविद्यालयांचे सहकार्य मिळाले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ