‘मले बी वोटिंग ले यिऊ द्या की..." मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर

 

 ‘मले बी वोटिंग ले यिऊ द्या की..."

मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

अकोला, दि. 20 :  लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याअंतर्गत जि. प. शिक्षकांनीकडूनही पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती होत आहे.  

या पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हिंमत ढाळे, राजेश देशमुख, निलेश कवडे, संजय जगताप, धिरज चावरे, सुनिल दिवनाले, संजय गावंडे, विद्याताई बनाफर, वैशाली दोंदलकर, रजनी मेतकर, मेघा बुलबुले, दीपमाला भटकर आणि पंकज वानखडे (ढोलकी वादक) आदी कलावंतांचा या उपक्रमात सहभाग आहे.

 

 

‘मले बी वोटिंग ले यिऊ द्या की...’ अशी गाणी व वऱ्हाडी बोलीतील प्रभावी संवादाच्या माध्यमातून मतदानाची योग्य पद्धत, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक, मिश्किल व खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहेत.  

  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ