दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार

 

दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार

अकोला, दि. 16 : दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य ने-आण करण्याचा निर्णय अकोला ऑटो संघटनेने घेतला आङे.

अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या दालनात अकोला ऑटो संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला. दिव्यांग मतदार मदत कक्षाचे नियंत्रण अधिकारी संजय राजनकर, कैलास ठाकूर, ऑटो युनियनचे अध्यक्ष संतोष शर्मा, रामेश्वर अहिर, मनीष कन्हेर, दीपक वगारे, अनिल भातुलकर, झाकिर खान, जाफर सेठ, सतीश वाघमारे आदी उपस्थित होते.

शहरातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अकोला महापालिकेच्या झोननिहाय चार ठिकाणी व  बसस्थानकाजवळ प्रत्येकी 10 प्रमाणे एकूण 50 ऑटोरिक्षाची सेवा युनियनतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या नियंत्रण कक्षात दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक दिला जाईल. दिव्यांग मतदाराने दूरध्वनी केल्यावर संबंधित झोनमधील रिक्षा त्या दिव्यांगापर्यंत पोहोचून त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल.

नियुक्त झोनल अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचीही या उपक्रमासाठी मदत होणार आहे.  दिव्यांग मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्रीमती भालेराव यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ