निवडणूक कामकाजासाठी अकोट कृउबास दोन दिवस बंद

 निवडणूक कामकाजासाठी अकोट कृउबास दोन दिवस बंद

अकोला, दि. 22 : लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाकरिता मतदान केंद्रावर नियुक्त पथकांना दि. 25 एप्रिल रोजी आवश्यक साहित्य वाटप करणे व दि. 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर साहित्य स्वीकारणे यासाठी अकोट विधानसभा मतदारसंघासाठी पोपटखेड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गोदाम क्रमांक 5 हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. 

मतदान साहित्याचे वाटप, स्वीकारणे आदी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती दि. 25 व 26 एप्रिल रोजी बंद राहील. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा