मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग







 

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

अकोला, दि. 25 : अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांपैकी एकूण 1 हजार 38 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग निश्चित आहे.

 

याअनुषंगाने नियोजनभवनात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून, वेब कास्टिंग, जीपीएस कंट्रोल, पोल डे मॉनिटरिंग, ईव्हीएम मॉनिटरिंग आदी कार्यवाही स्वतंत्रपणे होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज या यंत्रणेची पाहणी करून सतर्क राहून कामे करण्याची सूचना दिली. आदर्श आचारसंहिता कक्षाचे रामदास सिद्धभट्टी, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.

 

अकोट विधानसभा मतदारसंघात 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला (पश्चिम) मतदारसंघात 160, अकोला (पूर्व) मतदारसंघात 177, मूर्तिजापूरमध्ये 193 व रिसोड मतदारसंघातील 170 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. याद्वारे मतदान केंद्रांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ