मतदानाच्या दिवशी जाहिरातींसाठी 3 दिवस आधी अर्ज आवश्यक

 

मतदानाच्या दिवशी जाहिरातींसाठी

3 दिवस आधी अर्ज आवश्यक

 

            अकोला, दि. 19 : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिरात करावयाची असल्यास जाहिराचा मजकूर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण संनियंत्रण समितीकडून  (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.

          जिल्ह्यात दुस-या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार दि. 25 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणा-या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे तीन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार मतदानापूर्वीचा व मतदानाच्या दिवसासाठी  अनुक्रमे सोमवार व मंगळवारपर्यंत अर्ज येणे आवश्यक आहे.

          प्रमाणीकरणाचे अर्ज एक खिडकी कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

          

000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ