मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन बॉक्सिंगपटू पलक झांबरे, राहिल सिद्धिकी, विशाल कोरडे अकोल्याचे सदिच्छादूत

 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

बॉक्सिंगपटू पलक झांबरे, राहिल सिद्धिकी, विशाल कोरडे अकोल्याचे सदिच्छादूत

           अकोला, दि. 16 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवांगुळ यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

            प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अकोला जिल्ह्यात बॉक्सिंगपटू पलक झांबरे, राहिल सिद्धिकी व दिव्यांगांसाठी प्रा. विशाल कोरडे सदिच्छादूत म्हणून काम करतील. अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. यवतमाळमध्ये अंकुर वाढवे, आकाश चिकटे काम करणार आहेत.

           

           

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ