दिव्यांग मतदारांसाठी कॉल सेंटर जिल्हाधिका-यांकडून आढावा

 दिव्यांग मतदारांसाठी कॉल सेंटर

जिल्हाधिका-यांकडून आढावा

अकोला, दि. 20 : दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी आणि दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी कॉल सेंटर शहरातील मलकापूर परिसरातील मूकबधीर मुलींच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार व ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांनी आज तिथे भेट देऊन कामकाजाची आढावा घेतला.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात मूकबधिर मुलींची शाळा येथे कॉल सेंटर सुरू आहे. त्यांनी आज कॉल सेंटरला भेट देऊन तेथील कामांची माहिती घेतली. दिव्यांग बांधवांपर्यंतची मतदानासाठीच्या सर्व सुविधांची माहिती पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. दिव्यांगांचे जिल्ह्यात 100 टक्के मतदान व्हावे, असे नियोजन आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती श्रीमती वैष्णवी यांनी दिली.

असे चालते कॉल सेंटरचे कामकाज

कॉल सेंटरमधून दिव्यांग मतदारांना कॉल करून मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यांना सक्षम ॲपबद्दल माहिती दिली जात आहे. त्यांच्या अडचणी जाणून मतदान केंद्रांवर उपलब्ध सुविधा जसे की व्हील चेअर, पिकअप अँड ड्रॉप व्हॅन, तसेच मदतनीस आदी सुविधांची माहिती देण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांना मतदानाबाबत काही जाणून घ्यायचे असल्यास मदत कक्षाचे मो. क्र. 9767318006 व 9834438379 येथे सेवा उपलब्ध आहे. त्याशिवाय, 1950 टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहे.

समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप सुसतकर यांच्या मार्गदर्शनात केंद्रांत स्व, कनूबाई वोरा अं




ध विद्यालय, कर्णबधीर मुलींची शाळा व स्व. मोतीरामजी चिंचोलकर विद्यालय, संत गाडगेबाबा मूकबधीर विद्यालय येथील 22 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत अकोला शहरातील 5 हजार 812 दिव्यांग व्यक्तींशी थेट संपर्क करण्यात आला. अधिक्षिका सुषमा मसने, गजानन महल्ले, राजेश खुमकर, सुनील बोंगीरवार, शेखर भोंबळे, संदीप गुळाखे, किशोर ठाकरे, उज्ज्वला मानकर, सचिन चव्हाण, गब्बरसिंग राठोड, संजय बरडे, मो. अजीज आदी समन्वय व परिश्रम घेत आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ