मतदानाच्या दिवशी जाहिरातींसाठी प्रमाणीकरण आवश्यक

 

 मतदानाच्या दिवशी जाहिरातींसाठी

प्रमाणीकरण आवश्यक

 

            अकोला, दि. 23 : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिरात करावयाची असल्यास जाहिराचा मजकूर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण संनियंत्रण समितीकडून  (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.

          जिल्ह्यात दुस-या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार दि. 25 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणा-या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे तीन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणीकरणाचे अर्ज एक खिडकी कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

          

000

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा