अवैध मद्यविक्रीवर, उत्पादन शुल्क पथकांची नजर

 

अवैध मद्यविक्रीवर, उत्पादन शुल्क पथकांची नजर

अकोला, दि. 16 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्यविक्री, वाहतूक व निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध पथके कार्यान्वित असून, कारवायांना वेग आला आहे.

अवैध मद्यविक्री अनुषंगाने आक्षेपार्ह काही आढळून आल्यास कठोर गुन्हा अन्वेषणाची कारवाई करण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार  

भरारी पथकाकडून दि. 10 जानेवारी रोजी हॉटेल शक्ती येथे छापा घातला असता कमल गुरूमुखदास दुर्गिया रा. सिंधी कॅम्प, अकोला यांच्या ताब्यातून अवैध विक्रीच्या उद्देशाने आणलेला 30 हजार 715 रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात विविध ब्रँडच्या 650 मिली क्षमतेच्या 84 सीलबंद बाटल्या, 500 मिली क्षमतेच्या 42 सीलबंद बाटल्या, 330 मिली क्षमतेच्या 23 कॅन, विविध ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 20 सीलबंद बाटल्या, 375 मिली क्षमतेच्या पोर्ट वाईनच्या 4 सीलबंद बाटल्या आदी मालाचा समावेश होता.

या बीअर व वाईनचा साठा ममता बीअर शॉपी या दुकानातून बेकायदेशीरपणे अवैध विक्रीसाठी आणला असल्याचे व आरोपीत व्यक्ती या शॉपीमध्ये काम करत असल्याची तपासात उघड झाले. या दुकानाचे सखोल निरीक्षण करून त्याविरुद्ध विसंगती प्रकरण नोंदवून त्याचे व्यवहार बंद करण्याबाबत आदेश पारित आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ