जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा




जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा

अकोला, दि. 12 : जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकाऱ्यांचा कामांचा आढावा आज नियोजन भवनात घेतला.

‘स्‍वीप’ प्रमुख बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिध्दभट्टी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांगाचे मतदान शंभर टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्हाटसग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांशी संपर्क ठेऊन त्यांना सुविधांची माहिती द्यावी व मतदानाबाबत जागृती करावी. उमेदवाराला कुठल्याही बाबीसाठी परवानगी देतांना काटेकोर तपासणी करावी. निवडणूक खर्चाची गणना सर्व तपशीलासह कसून करावी. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी खर्चाबाबत वेळोवेळी खर्च सनियंत्रण समिती पथकाला कळविणे आवश्यक आहे. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आदर्श आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समिती आदी विविध कक्ष व समित्यांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

000000



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ