मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

अकोला, दि. 3 : मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून, तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने बंद राहतील. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला.

आदेशानुसार, दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा. पासून ते दि. 26 एप्रिल रोजी मतदान संपेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात मद्यविक्री दुकाने बंद राहतील. मतमोजणीच्या दिवशी दि. 4 जून रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील. कोरडे दिवस जाहीर झालेल्या तारखांना कुठेही दुकानांतून मद्यविक्री किंवा अवैध मद्यविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, याप्रकरणी कुठेही कुचराई झाल्याचे आढळल्यास आपणास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक व दुय्यम निरीक्षकांना देण्यात आला आहे.

०००     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ