माझे मत, माझी ताकद’ : आरएलटी महाविद्यालयात लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा नोडल अधिकारी वैष्णवी बी. यांचा नवमतदारांशी संवाद

 माझे मत, माझी ताकद’ : आरएलटी महाविद्यालयात लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा 

नोडल अधिकारी वैष्णवी बी. यांचा नवमतदारांशी संवाद 

अकोला, दि. 18 : ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांनी आज नवमतदारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. मतदान, निवडणूक प्रक्रिया याबाबत लोकशाही शिक्षणाची कार्यशाळाच आज आर. एल. टी. महाविद्यालयात झाली. 


 महाविद्यालयाचे प्राचार्य विजय नानोटी, पंकज देशमुख व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी नोडल अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाब, एक व्यक्ती एका मताचा प्रत्येकाला मिळालेला अधिकार, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी निर्माण केलेल्या विविध सुविधा आदी माहिती देत नवमतदारांना मतदानाचे आवाहन केले.


यावेळी नवमतदारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तरे देऊन सर्वांचे शंकानिरसन केले. आर. जे. दिव्या व आर. जे. आरव  यांनी तरूणांना प्रोत्साहित करत हा संवाद फुलवत नेला.  ‘माझे मत, माझी ताकद’ ची घोषणा देत नवमतदारांशी मतदार जागृतीची शपथही घेतली.

‘उमेद’च्या बचत गटातर्फे जनजागृती रॅली

 

‘उमेद’अंतर्गत महिला बाळापूर तालुक्यातील वझेगाव व अकोट तालुक्यातील चंडिकापूर येथील बचत गटांतर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मतदान व मतदार जागृती करण्याचा निर्धार महिलाभगिनींनी केला. 

कृषी विद्यापाठीतही कार्यक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या उपस्थितीत नवमतदारांसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नवमतदारांनी मतदार जागृतीची शपथ घेतली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ