‘स्वीप’अंतर्गत उपक्रमांना वेग; ‘एमआयडीसी’त कामगारांनी घेतली मतदानाची शपथ

अकोला, दि. 16 : लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी   ‘स्वीप’अंतर्गत उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. येथील औद्योगिक वसाहत परिसरात कामगार बांधवांनी आज मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची व जनजागृतीची शपथ घेतली.

निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. स्वीप पथके ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करत आहेत. याचअंतर्गत येथील औद्योगिक वसाहत परिसरात कार्यक्रम झाला. नोडल अधिकारी श्रीमती वैष्णवी यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक संघटना व कामगार बांधव उपस्थित होते.

यावेळी श्रीमती वैष्णवी यांनी संवाद साधून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. तसेच मतदान व मतदार जनजागृतीसाठी सक्रिय सहभागाची शपथ घेण्यात आली.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ