पातुर तालुक्यातील अवेळी पावसाने नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 







पातुर तालुक्यातील अवेळी पावसाने नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अकोला, दि. 12 : जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पातुर तालुक्यातील अवेळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी आज केली. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत ‍मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रीया तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

            जिल्‍हाधिकाऱ्यांनी पातुर तालुक्यातील अंबाशी, देऊळगाव, जांभरून आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पातुरचे तहसीलदार राहुल वानखडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

परिसरात आंब्याची झाडे, लिंबू बगीचे, उन्हाळी भुईमुग, कांदा आदी विविध पिकांचे अवेळी पावसाने नुकसान झाल्याचे दिसून येते. त्याचे सर्व तपशीलासह काटेकोर पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ