विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांनी घेतली मतदार जागृतीची शपथ






विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांनी घेतली मतदार जागृतीची शपथ

अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील अनेक दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांनी आज मतदार जागृतीची शपथ घेतली. ‘स्वीप’अंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात हा कार्यक्रम झाला.

 ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, दिव्यांग कक्षाच्या नोडल अधिकारी मंगला मून, दिव्यांग कक्षाचे सदिच्छा दूत डॉ. विशाल कोरडे, जयश्री अम्मा आदी यावेळी उपस्थित होते. ‘मी जागरूक मतदार, मतदान करणारच’, ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ अशा विविध घोषणा उत्साहाने देत दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांनी मतदार जागृतीसाठी योगदान देण्याची शपथ घेतली.

यावेळी डॉ. पाण्डेय यांनी दिव्यांगांसाठी देण्यात आलेल्या सुविधा, प्रशासनाची तयारी आदी विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिव्यांगांशी संवादही साधला.

सदिच्छादूत डॉ. विशाल कोरडे यांनी दिव्यांग मतदार गीत सादर केले. यावेळी नियोजनभवनात ठेवलेल्या स्वाक्षरीफलकावरही मान्यवरांसह सर्वांनी सह्या केल्या.

श्रीमती मून यांनी संयोजन केले. समन्वय अधिकारी गजानन इंगोले यांनी सूत्रसंचालन केले.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम