पोलीस दलासाठी अद्ययावत वाहनांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
अकोला, दि. 7 : अकोला जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २ कोटी ८१ लक्ष निधीतून खरेदी केलेल्या १५ वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमोल मिटकरी , विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस दलासाठी अद्ययावत वाहने उपलब्ध झाली असून, आवश्यकतेनुसार इतर बाबींसाठीही निधी दिला जाईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. या वाहनात एसयुव्ही, स्कॉर्पिओ, लाईट व्हॅन आदींचा समावेश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा