प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत प्रक्रिया उद्योगांसाठी अनुदान

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत प्रक्रिया उद्योगांसाठी अनुदान 

अकोला :  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत नाशवंत फळपीके, कोरडवाहू पीके,   भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये,  कडधान्ये,  तेलबिया, मसाला पिके, गूळ  आदींवर आधारित उत्पादने, दुग्ध उत्पादने, किरकोळ वन उत्पादने आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट व संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.  

          वैयक्तिक  सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प या घटकात नविन प्रकल्प उभारणी, अस्तित्वात असलेल्या कार्यरत प्रकल्पाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी भांडवली गुंतवणूकीसाठी अर्थसहाय्य मिळते. या घटकात एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमात  भांडवली खर्चाच्या  35 टक्के किंवा जास्तीत जास्त रक्कम 10 लाख रू. अनुदान देय  आहे. वैयक्तिक मालकी, भागीदार, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, स्वयंसेवी किंवा सहकारी खाजगी कंपनी यांना हे लागू आहे.

सामाईक पायाभुत सुविधा या घटकात  पात्र प्रकल्प  खर्चाच्या 35 टक्के  बँक  कर्जाशी निगडित अनुदान देय आहे. शेती स्तरावरील  पायाभुत सुविधा,  पॅकहाऊस पॅकेजिंग आणि ग्रेडिंग, प्रक्रिया युनिट, साठवण गृह, वितरण, वाहतूक व्हॅन आदी. प्रकल्पाची कमाल आर्थ‍िक मर्यादा  3 कोटी रू. आहे.

मार्केटिंग किंवा ब्रँडिंगसाठी पात्र  प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान  देय आहे.  अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संस्था  व सहकारी उत्पादक  यांना लाभ मिळतो.

          योजनेत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी  ऑनलाईन  पोर्टल www.Mofpi.gov.in वर ऑनलाईन  अर्ज करू शकतात.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच  इतर कागदपत्रे मिळवून देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती यांची निवड करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी योजनेचे  नोडल अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  कार्यालय, तालुका कृषि  अधिकारी  यांच्याशी संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ