विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनांसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनांसाठी

अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 

अकोला, दि. 18 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे. 

अनुसूचित जाती,विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहेत. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर प्रथम वर्षाचे नुतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 11 ऑक्टोबरपासून महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरु करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.         

महाविद्यालयांच्या स्तरावर गतवर्षीचे अर्ज प्रलंबितच

महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डच्या सद्यस्थितीचे अवलोकन केले असता अनेक महाविद्यालयाच्या स्तरावर सन 2022-23  या शैक्षणिक वर्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 701,  विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 964 अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. समाजकल्याण कार्यालयाकडून वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे महाविद्यालयातील प्रलंबित अर्जाची तपासणी व पडताळणी करून तसेच अर्जातील त्रुटींची पूर्तता करून तत्काळ समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन श्रीमती मून यांनी केले.

पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्रे भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ