ग्रा. पं. निवडणूक क्षेत्रात ३ दिवस मद्यविक्रीला प्रतिबंध
ग्रा. पं. निवडणूक क्षेत्रात ३ दिवस मद्यविक्रीला प्रतिबंध
अकोला, दि. १८ : ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाआधीचा, मतदानाचा व मतमोजणीचा असे 3 कोरडे दिवस जाहीर करण्यात आले असून, यादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.
निवडणूक असलेल्या ग्रा. पं. क्षेत्रात मतदानाआधीचा दिवस दि. ४ नोव्हेंबर (संपुर्ण दिवस), मतदानाचा दिवस दि. ५ नोव्हेंबर (संपूर्ण दिवस) व मतमोजणीचा दिवस दि. ६ नोव्हेंबर या तीन दिवशी मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील. मतमोजणी असणाऱ्या तालुका मुख्यालयी, महानगरपालिका व नगरपरिषद, तसेच नगरपंचायत क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा