नगरपरिषद गट क परीक्षेसाठी उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
नगरपरिषद गट क परीक्षेसाठी उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक
आदेश जारी
अकोला, दि. 23 : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा दि.
25 ते 28 ऑक्टोबर, तसेच दि. 2 व 3 नोव्हेंबर या तारखांना तीन सत्रांत ऑनलाईन पद्धतीने
होणार आहे. त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेसाठी फौजदारी प्रक्रिया 144 अन्वये जिल्ह्यातील
दोन परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अजित
कुंभार यांनी निर्गमित केला.
विहित तारखांना सकाळी 6 ते रा. 8 या वेळेत उपकेंद्राचा आतील संपूर्ण
परिसर व बाहेरील 100 मीटर परिसरात आदेश लागू राहतील. श्री इन्फोटेक (वैभव उपाहारगृहाजवळ,
अकोला- वाशिम रस्ता) व अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बाभुळगाव, नागपूर रस्ता,
महामार्ग क्र. 6) येथील उपकेंद्रावर दि. 3 नोव्हेंबरला परीक्षा होईल. आदेशानुसार नमूद
कालावधीत केंद्रांवर 5पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित प्रवेश करणे, शांततेत बाधा आणणे,
इलेक्ट्रॉनिक, डिजीटल साधने घेऊन येणे, अनधिकृत व्यक्ती किंवा वाहने यांना बंदी घालण्यात
आली आहे. परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फोन बुथ, ध्वनीक्षेपक
परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा