शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  








अकोला, दि. ७ : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २४ शहिदांचे स्मारक उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे स्मारक होणे ही पहिलीच घटना असावी. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर शहिदांच्या बलिदानामुळे देशाची लोकशाही अबाधित राहिली आहे. त्यामुळेच भारत देश एक मजबुत राष्ट्र म्हणून उभे राहिला आहे. हे शहिद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
नेहरू पार्क येथील शहीद स्मारकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी शहिद स्मारक उभारण्यात आले आहे. शहिदांच्या समर्पणामुळेच देशातील लोकशाही अबाधित आहे. देशातील जवान अत्यंत खडतर परिस्थितीत कर्तव्य बजावत आहेत.  
जिह्यातील शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शहिदांचे पुतळे उभारणे ही देशातील अभिनव संकल्पना आहे. ही उत्कृष्ट संकल्पना मांडल्याबद्दल आमदार बच्चूभाऊ कडू यांचे अभिनंदन करताना संकल्पना पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन त्यांनी केले. शहिदांचे पुतळे एकत्र करून एकाच ठिकाणी उभारले आहेत. हे शहिद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. शहिदांच्या त्यागामुळे देशात लोकशाही अबाधित राहिली आहे. त्यामुळेच देश एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. शहिद स्मारक लोकशाहीचे मोल सांगेल, त्यामुळे या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित कराव्यात, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या. सुरुवातीला श्री. फडणवीस यांनी शहिद स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहीद स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच स्मारकाची पाहणी केली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ