विविध प्रकल्पांतील 92.676 दलघमी पाणी आरक्षित

 विविध प्रकल्पांतील 92.676 दलघमी पाणी आरक्षित

अकोला, दि. 20 : चालू वर्षासाठी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी व आकस्मिक पाणी आरक्षणासाठी विविध प्रकल्पांतील एकूण 92.676 दलघमी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हा पाणी आरक्षण समितीतर्फे घेण्यात आला.

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक सोमवारी झाली. त्यात प्रकल्प व योजनानिहाय चर्चा होऊन पाणी आरक्षणाचा निर्णय झाला.

   

त्यानुसार काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासाठी 24 दलघमी, महान मत्स्यबीज केंद्र पा. पु. योजनेसाठी 0.25, 64 खेडी पा. पु. योजनेसाठी 6.99 दलघमी, मूर्तिजापूर शहरासाठी 3.53 दलघमी, एमआयडीसीसाठी 0.74 पाणी आरक्षित करण्यात आले. वान प्रकल्पातून अकोट शहरासाठी 8.66, तेल्हारा शहरासाठी 2, शेगाव शहरासाठी 5.27, तसेच 84 खेडी योजनेसाठी 10.75 व जळगाव जामोद 140 खेडी योजनेसाठी 7.354 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले.

 

मोर्णा प्रकल्पातून पातुरसाठी 1.242, देऊळगाव पास्टुल 16 गावे योजनेसाठी 1.91, तर निर्गुणा प्रकल्पातून आलेगाव-नवेगाव 14 गावे योजनेसाठी 1.79 दलघमी पाणी आरक्षणाचा निर्णय झाला. उमा प्रकल्पातून लंघापूर 59 खेडी योजनेसाठी 1.30 व मन प्रकल्पातून पारस औष्णिक केंद्रासाठी 14.50 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. शेगावसाठी मन प्रकल्पातून 1.04 व कसुरा बं. येथून 0.75 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले.

बिगर सिंचन योजनांचे प्राप्त मागणीनुसार आरक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  त्याचप्रमाणे, बिगर सिंचन मागणी वजा करून उर्वरित शिल्लक राहणा-या पाणीसाठ्यावर रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करण्याचे व बिगर सिंचन यंत्रणांकडे असलेल्या थकबाकीबाबत त्वरित आढावा बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

गेल्या काही वर्षांपासून 64 खेडी पाणीपुरवठा योजना (काटेपूर्णा प्रकल्प), 84 खेडी पाणीपुरवठा योजना (वान प्रकल्प) मंजूर आरक्षणापेक्षा जास्त पाणी आरक्षित करत आहेत. महान मत्स्यबीज केंद्र (काटेपूर्णा प्रकल्प) व पातूर शहर पाणीपुरवठा योजना (मोर्णा प्रकल्प) दरवर्षी आकस्मिक पाणी आरक्षण करत आहेत. वाढीव बिगर सिंचन पाण्याची गरज लक्षात घेता वाढीव आरक्षणाचे प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले