प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे 

पंतप्रधानांच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण

 

अकोला जिल्ह्यात सुरू होणार ९ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

 

अकोला, दि. 18 : राज्यातील ५०० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी (दि. १९ ऑक्टोबर) रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील ९ केंद्रांचा समावेश आहे.

 

 

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रातील युवक युवतींच्या कौशल्य विकासासाठी व त्यांच्यातून उद्योजक निर्माण होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराची गरज पडू नये व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रथम टप्प्यात ५००  केंद्रांची निर्मीती करण्यात येत आहे.

 

अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू (अकोला), मुंडगाव (अकोट),  चोहट्टा (अकोट), वाडेगाव  (बाळापूर), माळेगाव बाजार (तेल्हारा), हिवरखेड (तेल्हारा), हातगाव ( मूर्तिजापूर), पिंजर महान (बार्शिटाकळी), आलेगाव (पातूर) या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू होत आहेत. 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नागरिकांना संबोधित करणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. युवक, युवती व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ