निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र तात्काळ सादर करा - जिल्हा कोषागाराकडून आवाहन
निवृत्तीवेतनधारकांनी हयात
प्रमाणपत्र तात्काळ सादर करा
- जिल्हा कोषागाराकडून आवाहन
अकोला दि. २७
: जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक,माजी आमदार तसेच इतर सर्व
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर २०२३ मधील निवृत्तीवेतनासाठी आपल्या
बँकेत जाऊन हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी. बँकेत त्यासंबंधीची यादी उपलब्ध आहे,
असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी या यादीमध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनी
क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डिसेंबर २०२३ चे निवृत्तीवेतन काढता
येणार नाही. करपात्र
उत्पन्न असणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना जुन्या करसंरचनेप्रमाणे प्राप्तीकर गणना
करावयाची असल्यास तसा अर्ज कोषागार कार्यालय, अकोला येथे सादर करावा अन्यथा नव्या प्रणालीनुसार प्राप्तीकर कपात करण्यात
येईल. वयाची ८० वर्ष पूर्ण करणा-या किंवा
त्यावरील निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनात १० टक्के
वाढ मिळाली नाही त्यांनी तात्काळ आधारकार्ड तसेच बँक पासबुक घेऊन कोषागार कार्यालय,
अकोला येथे अर्ज सादर करावा. जेणेकरून प्रचलित नियमानुसार लाभ देता
येईल. याबाबत अकोला जिल्ह्यातील जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन
घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगांवकर यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा