आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ





 आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

 

अकोला, दि. 13 : आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी आपत्ती निवारणासाठी सदैव सक्रिय राहण्याची शपथ घेतली.

लोकशाही सभागृहात  हा कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी उपस्थितांना शपथ दिली. आपत्ती निवारणाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपत्तीपासून समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन व अशा कार्यात सक्रिय सहभाग घेईन, अशा आशयाची शपथ घेण्यात आली. सहायक अधिक्षक शिवहरी थोंबे, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी संदीप साबळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विविध शाळा- महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

 

     संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने दर वर्षी दि. 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्‍यात येतो.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले