जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषद मुद्दे
०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत
प्रारुप
मतदार यादी प्रसिध्दी दिनांक २७/१०/२०२३
च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजीत
पत्रकार परिषद
लोकशाही
सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी
करून आपला मताधिकार बजावावा, असे
आवाहन अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. निवडणुका
पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण,
शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत
निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो.
दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर
आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम दिनांक २७
ऑक्टोबर ते दिनांक ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. दिनांक ०१
जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना
कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच सन २०२४ च्या एप्रिल,
जुलै, ऑक्टोबर
या महिन्यांच्या ०१ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत
आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र
त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. सन २०२४ मध्ये येऊ
घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची
संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे
आवाहन श्री.अजित कुंभार,
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे.
प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी
खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा
ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी
तक्रार अनेक मतदाराकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता,
लिंग, जन्मदिनांक,
वय, ओळखपत्र
क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक
आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या
करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते,
त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता
येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल,
तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप
घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची
वगळणी केली जाते. मतदार याद्याचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची
वगळणीही महत्त्वाची असते.
समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प
प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला
व दिव्यांग व्यक्ती याच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या
मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ
यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र
आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य
घेण्यात येणार आहे. तर दिव्यागांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने
दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची
मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. त्यासाठी या
कार्यालयामार्फत कालाबध्द कार्यक्रम तयार करून देण्यात आलेला आहे. तृतीयपंथी
व्यक्ती, शरीरव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया,
भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये
शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सदर
समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य
आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना
स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही
कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत.
ग्राम
विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे.
या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत
नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न
होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात
कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच
दुबार नावे, मृत व्यक्ती,
गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती,
लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची
मतदार यादीतून वगळणी केली जाईल.
दिनांक
२७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील अकोला जिल्हयातील एकूण
मतदारसंख्या पंधरा लक्ष तेहतीस हजार नउशे त्रयान्न्व (१५,३३,९९३)
एवढी आहे आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७८.५३ टक्के इतकी
आहे.मतदारांचा मतदार संघनिहाय तपशील खालील प्रमाणे आहे.
प्रारुप
मतदार यादीतील मतदार संघनिहाय मतदार तपशील
Details |
28
Akot |
29
Balapur |
30 Akola west |
31
Akola East |
32
Murtizapur |
TOTAL |
Electors Total |
291646 |
289776 |
326182 |
333853 |
292536 |
1533993 |
Male |
153594 |
151132 |
165704 |
172225 |
152097 |
794752 |
Female |
138048 |
138638 |
160458 |
161613 |
140433 |
739190 |
Third Gender |
4 |
6 |
20 |
15 |
6 |
51 |
PwD Electors (Marked in the electoral roll database) |
1537 |
2275 |
2834 |
1916 |
2661 |
11223 |
Service Electors |
779 |
973 |
293 |
600 |
653 |
3298 |
दिनांक
२७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या सात
लक्ष चौ-यान्नव हजार सातशे बावन्न (७,९४,७५२)
एवढी आहे. तरी स्त्री मतदारांची संख्या
सात लक्ष एकोणचाळीस हजार एकशे नव्वद(७,३९,१९०)
एवढी आहे. या मतदार यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९१५ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर २०२३ मधील
संख्या एक्कावन (५१)इतकी आहे.
भारत
हा तरुणांचा देश आहे अस आपण एकीकडे म्हणतो, पण
मतदार यादीतली १८ ते १९ वयोगटातील नवमतदाराच्या नोंदणीचे प्रमाण समाधानकारक नाही.
त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे
आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 'उत्कृष्ट
मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा'चे
आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे
उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुनरिक्षण पूर्व उपक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरण व
पुर्नरचना कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हयात मूळ मतदान केंद्राची संख्या ही १७०४
होती त्यामध्ये मतदान केंद्राचे अंतर जास्त असल्यमूळे व मतदार संख्या १५००
पेक्षा जास्त झाल्यामूळे एकूण १५ नविन केंद्रे प्रस्तावीत करण्यात आली होती तर
१२ मतदान केंद्राच्या नावात बदल, ६९
मतदान केंद्राच्या ठिकाणात बदलीबाबतचा प्रस्ताव मा.मुख्य निवडणूक अधिकारी
महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांना सादर करण्यात
आला होता व त्यास दिनांक – १८.१०.२०२३ रोजी मा.भारत निवडणूक आयोग यांच्याव्दारे
मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानुसार आता अकोला जिल्हयातील एकूण मतदान
केंद्राची संख्या ही १७१९ एवढी झाली आहे.
मतदान
केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम |
||||||
अ. क्र. |
मतदार
संघाचे क्रमांक व नांव |
आधीची
मतदान केंद्र संख्या |
मान्यता
मिळालेल्या नविन मतदान केंद्रांची संख्या |
एकूण मतदान
केंद्रांची संख्या |
मतदान
केंद्राच्या नांवात बदल |
मतदान
केंद्राच्या ठिकाणात बदल |
1 |
28- अकोट |
331 |
5
- अंतर जास्त असल्यामुळे
प्रस्तावीत |
336 |
4 |
36 |
2 |
29- बाळापुर |
338 |
2
- अंतर जास्त असल्यामुळे
प्रस्तावीत |
340 |
3 |
13 |
3 |
30- अकोला (पश्चिम) |
307 |
0 |
307 |
3 |
7 |
4 |
31- अकोला (पुर्व) |
347 |
4
- मतदार संख्या १५००
पेक्षा जास्त झाल्यामुळे |
351 |
0 |
0 |
5 |
32- मुर्तीजापुर |
381 |
4 - मतदार संख्या १५०० पेक्षा जास्त झाल्यामुळे |
385 |
2 |
13 |
एकूण |
1704 |
15 |
1719 |
12 |
69 |
छायाचित्र मतदार यांद्याच्या या विशेष संक्षिप्त
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकाधीक पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी,
ज्या मतदारांनी त्यांच्या मतदार यादीमधील नोंदणीशी आधार क्रमांक अद्याप सलग्न
केलेला नाही, त्यांनी नमुना ६ ब भरून आपल्या
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी /मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावा. असे आवाहन
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी श्री अजित कुंभार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा