राज्यातील अभिनव प्रयोग; जिल्हाधिका-यांची संकल्पना जिल्ह्यात निर्माण होणार कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस

 


राज्यातील अभिनव प्रयोग; जिल्हाधिका-यांची संकल्पना

जिल्ह्यात निर्माण होणार कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस

 

*युवकांना स्वयंरोजगार

* नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी होणार मदत

 

अकोला, दि. 20 :  कुशल युवकांना स्वयंरोजगार मिळावा व नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम जिल्हा कौशल्य विकास विभागाने हाती घेतले आहे. शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतून किंवा अल्पकालीन प्रशिक्षण घेतलेल्या व स्वयंरोजगार करणा-या प्रशिक्षित युवकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

 

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस तयार करून तो ऑनलाईन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी विविध व्यवसाय करणा-या कुशल उमेदवारांची ऑनलाईन माहिती मिळून इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, ए.सी. टेक्निशियन, वाहनचालक, सुतार, गवंडी आदी आवश्यक मनुष्यबळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे, कुशल उमेदवारांना याद्वारे रोजगारही प्राप्त होणार आहे. कुशल उमेदवारांची डेटाबेस तयार करताना पोलीस पडताळणी व स्वयंघोषणापत्रही मिळविण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक सेवांसाठी विश्वासार्ह मनुष्यबळाचा तपशील अकोलेकरांना उपलब्ध होणार आहे.

 

 कशी कराल नोंदणी ?

स्वयंरोजगार करणा-या युवकांनी या डेटाबेसमध्ये आपले नाव समाविष्ट होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा. नोंदणी करताना  

उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात येईल व इच्छूक उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र भरून घेण्यात येईल.

 

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (संपर्कासाठी दूरध्वनी : (0724) 2433849, भ्रमणध्वनी :  9665775778)

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ