उत्सवानिमित्त जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ वाढवली

 

उत्सवानिमित्त जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ वाढवली

अकोला, दि. 20 : अकोला शहरात नवदुर्गा उत्सवानिमित्त गरबा रास आदी कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत.  हे लक्षात घेऊन शहरात जड वाहनाच्या प्रवेश बंदीची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे.

उत्सवाच्या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या अधिसूचनेनुसार जड वाहनास अकोला शहरात रात्री  10 वा. पासून प्रवेश शिथीलता देण्यात आली होती. तथापि, उत्सवानिमित्त शहरातील रस्त्यांवर वाढलेली रहदारी  लक्षात घेऊन मूळ अधिसूचनेत दि. 18 ऑक्टोबरपासून अंशत: बदल करून दि. 24 ऑक्टोबरपर्यंत जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ रात्री 12 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला.
 

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ