मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी सायकल रॅली

 मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी सायकल रॅली

अकोला, दि. 25 :  अकोला पूर्व मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी 7 वाजता रॅलीचा शुभारंभ होईल. रॅली पुढे अशोकवाटिका, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी रोड मार्गाने पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप होईल.

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन नवमतदार, दिव्यांग, विमुक्त भटक्या जमाती, आदिवासी जमाती, महिला, तृतीयपंथी आदींसाठी मतदार नोंदणी शिबिरे व विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सायकल रॅलीत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ