मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान; अर्ज मागविले

 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान; अर्ज मागविले

अकोला, दि. 26 : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येते. संरक्षित सिंचनासाठी या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

शेतीला संरक्षित सिंचन मिळावे या उद्देशाने ही योजना राबवली जाते. अर्जदार शेतक-याकडे 0.20 हे. क्षेत्र असणे आवश्यक आहे. जमीन शेततळे खोदण्यास योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर योजनांतून शेततळ्यासाठी अनुदान घेतलेले नसावे.

योजनेत जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय तीन व कमीत कमी 15 बाय 15 बाय तीन मीटर अशा विविध आठ प्रकारच्या आकारमानाचे इनलेट व आऊटलेटसह व इनलेट आऊटलेटविरहित शेततळ्यासाठी खोदकामाच्या परिमाणानुसार कमाल 75 हजार रू. अनुदान दिले जाते. इच्छूकांनी महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या ऑनलाईन नोंद करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ