अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे ट्रॅक्टर खरेदीवर सवलत
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळातर्फे ट्रॅक्टर खरेदीवर सवलत
अकोला : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळातर्फे ट्रॅक्टर खरेदीवर सवलत योजना पुन्हा सुरु करण्यात आली असून त्याचा
शुभारंभ दसऱ्यापासून करण्यात आला आहे.
महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा
योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरु करण्यात आली आहे. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू)
करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज
परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित
करण्यात आल्या आहेत.
ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरु करुन त्याचा
लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता ही योजना सुरू करत असल्याचे महामंडळाचे
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने
महामंडळाच्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा
योजना (IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा रु. १० लाखांवरुन रु. १५ लाखांपर्यंत वाढवण्यात
आली आहे. ३ लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ४.५
लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी ५ वर्षांहून ७ वर्षापर्यंत वाढविला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वाकरिता वयोमर्यादेची
अट ६० वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर
बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन
स्वरुपात सहकार्य सीएससी (CSC) सेंटरच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्या स्तरावर सुरु आहे.
येथे संपर्क साधा
ट्रॅक्टर योजनेसाठी शिधापत्रिका, पॅनकार्ड, आधारकार्ड,
शाळा सोडल्याचा दाखला,जातीचा दाखला, उत्पन्न दाखला किंवा चालू वर्षाचे प्राप्तीकर रिटर्न
आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रोहित बारस्कर
यांच्याशी 9834629036 या भ्रमणध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा